नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जमिनीची उत्पादन क्षमता वाढविणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने मृदा आरोग्य पत्रिका योजना सुरू केलेली आहे. देशभरातल्या शेतकऱ्यांकडून या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे आणि राष्ट्रीय मोहिमेचे स्वरुप या योजनेने घेतले आहे.
आकाशवाणीच्या चेन्नई प्रतिनिधीने तमिळनाडू राज्यात होत असलेल्या या योजनेच्या अंमलबजावणीची माहिती आहे. तमिळनाडूमधल्या शेतकऱ्यांना ८१.१८ लाख मृदा आरोग्य पत्रिका देण्यात आलेल्या आहेत. यासाठी जमिनीची मोफत चाचणी केली जाते आणि त्यातल्या पोषक घटकांची माहिती मृदा आरोग्य पत्रिकेवर शेतकऱ्यांना दिली जाते.