नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोस्टारिकामधे पोलीसांनी कोकेन या अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. जहाजातून नेदरलँडसला पाठवण्यात येणार्या शोभेच्या फुलांमधे पाच टनांहून जास्त कोकेन लपवले होतं.
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला असल्याचं कोस्टारिकाचे गृहमंत्री मायकल सोटो रोजस यांनी सांगितले.