Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातल्या आंदोलकांविरुद्ध नामांकित व्यक्तींचे राष्ट्रपतींना पत्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्यांविरुद्ध दिडशे प्रमुख नागरिकांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिले आहे. या प्रस्थापितांमध्ये माजी न्यायमूर्ती, अधिकारी, लष्करी अधिकारी आदींचा सामावेश आहे.

या कायद्याविरुद्ध तसंच राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या सूची विरुद्ध काही लोक संभ्रम निर्माण करत आहेत, असे या पत्रामध्ये नमूद केले आहे.  या कायद्यांविरुद्ध आंदोलन करणाऱ्यांना ज्यांचा पाठिंबा आहे, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी या पत्रात केली आहे.

या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. हे थांबवण्यासाठी आणि लोकशाही संस्थांच्या हितरक्षणासाठी केंद्रानं त्वरित पावले उचलावीत, असंही त्यांनी म्हटले आहे.

Exit mobile version