मुंबई : तेलंगणा राज्याच्या मेडिगट्टा धरणामुळे गडचिरोलीतील अनेक गावे बाधित होणार आहेत. या धरणासाठी तेलंगणा सरकारने महाराष्ट्रातील काही जमिनीचे अधिग्रहण केले आहे. अधिग्रहणापेक्षा जास्त जमिनीवर धरणाचे पाणी आले आहे. सिरोंचा भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर तेलंगणा सरकारशी चर्चा करून तोडगा काढू असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
याबाबत आमदार धर्मराव बाबा आत्राम आंदोलन करत आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले.