नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या बलुचीस्तान प्रांतात काल झालेल्या बॉम्बस्फोटात आठजण ठार, आणि २३ जण जखमी झाले. मृतांमध्ये काही पोलिसांचा समावेश आहे.
क्वेट्टा प्रेस क्लब इथे धार्मिक सभा सुरु असताना हा स्फोट झाला. हा आत्मघातकी बॉम्बहल्ला असल्याचा संशय आहे.
पाकिस्तानला सुरक्षा स्थितीतही सुधारणा निश्चितच उल्लेखनीय असल्याची प्रशंसा, पाकिस्तान दौ-यावर गेलेले संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी कालच केली होती, आणि कालच हा स्फोट झाला. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुणी घेतलेली नाही.