नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला तोंड देण्यासाठी सुरु असलेल्या भरमसाठ उपाय योजनांबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं इशारा दिला आहे.
चीनबाहेर या आजाराचा प्रादुर्भाव अत्यल्प असून, सार्स किंवा मर्ससारख्या इतर कोरोना विषाणूजन्य आजारांच्या तुलनेत कोविड-१९ हा आजार कमी घातक आहे, असं संघटनेनं म्हटलं आहे.
जपानप्रमाणे आणखी काही नव्या भागांमधे या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्व जहाजवाहतूक थांबवण्याची सूचना जागतिक आरोग्य संघटनेनं फेटाळून लावली आहे.
विमान आणि जहाजवाहतूकीवर घातलेल्या निर्बंधांमुळे कोरोनाबाधित क्षेत्रात कारखानदारी आणि पर्यटन उद्योग रोडावला आहे.