नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानात कराची इथं विषारी वायुमुळे गुमदमरल्यानं ११ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकांची प्रकृती बिघडली आहे.
गेल्या रविवारपासून श्वसनाच्या तक्रारींमुळे कराचीतल्या केमारी परिसरातले अनेक नागिरक रुग्णालयात दाखल होऊ लागल्यानंतर हा प्रकार उघडकीला आल्याचं रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. अद्याप या विषारी वायुचा स्त्रोताविषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही.