पुणे : पुणे जिल्ह्यातील 13 पंचायत समितीवर मा.मुख्य कार्यकारी अधिकारी ( CEO) जिल्हा परिषद पुणे यांचे नियंत्रण असते. या 13 पंचायत समित्यांमध्ये कोट्यवधींची भ्रष्टाचार प्रकरणे सर्वश्रुत आहेत. या विषयी 24 जानेवारी 2019 ला मावळचे धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते श्री दत्तात्रय पुताजी काजळे यांनी जिल्हा परिषद पुणे यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले होते. त्यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संदीप ना. कोहिनकर यांनी 40 दिवसात सर्व प्रकरणाची चौकशी करून, योग्य ती कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले होते.
तथापि 13 महिने उलटून गेले तरीही, 13 पंचायत समित्यांंमधील भ्रष्टाचाराच्या संदर्भात कोणतीही चौकशी अथवा कारवाई झालेली नाही. यासंदर्भात श्री. कोहिनकर यांच्याशी अनेकदा तोंडी चर्चा व लेखी पत्रव्यवहार करून, काहीही फायदा झाला नाही. याउलट भ्रष्टाचाराची प्रकरणे दाबून ठेवण्यासाठी श्री. कोहीनकर यांनी पदाचा गैरवापर केलेला आहे. हाताखालिल इतर अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून खोट्या टिपण्या तयार करून 13 पंचायत समितीमधील कोट्यवधींची भ्रष्टाचाराची प्रकरणे दाबून ठेवलेली आहेत. शिवाय पदाचा गैरवापर करून अनेक बेकायदेशीर कृत्ये केलेली आहेत.
त्यामुळे सदर उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संदीप कोहिनकर यांची तात्काळ तडकाफडकी बदली करून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी आणि 13 पंचायत समित्या व 1 जिल्हा परिषद भ्रष्टाचाराच्या विळख्यातून वाचविण्यासाठी मा.सामाजिक कार्यकर्ते मा.श्री दत्तात्रय पुताजी काजळे मावळ व त्यांचे सहकारी व नागरिक दिनांक 17/2/2020 पासून सकाळी 10 वाजल्यापासून बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत.
या आमरण उपोषणाला सामाजिक कार्यकर्ता दत्तात्रय पुताजी काजळे, सामाजिक कार्यकर्ता नितीन श. यादव (अध्यक्ष जागृत नागरिक महासंघ), अशोक कोकणे (पिं चिं शहर प्रमुख), राजेश्वर विश्वकर्मा (उपाध्यक्ष), उमेश सदाशिव सणस (सचिव), दिनकर मारुती यादव ,अजय बंदोबा सातकर ,संपत वि. गरुड, मच्छीनद्र गुजर, सुनील गुजर, लक्ष्मण पारखी, सतीश ढमाले, दत्तात्रय दोंडे, जिजाबा कदम, संतोष मोकाशी, शरद वाघुले, तानाजी काजळे, भिकाजी चांदगुडे, कमलेश शेळके, काळूराम भोंडवे, मोहन तनपुरे, केशव तनपुरे, बंदोबा सातकर व इतर मान्यवर उपस्थित होते.