Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून शिवजयंती उस्ताहात साजरी

????????????????????????????????????

पिंपरी :  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महापालिका प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतीमेस महापौर ऊषा ऊर्फ माई ढोरे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यापुर्वी दापोडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयासही महापौर ऊषा ऊर्फ माई ढोरे यांनी पुष्पांजली अर्पण केली. यावेळी नगरसदस्या आशा धायगुडे – शेंडगे, माई काटे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

फुगेवाडी येथील पुतळयास महापौर ऊषा ऊर्फ माई ढोरे यांनी पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी नगरसदस्या आशा धायगुडे – शेंडगे, माई काटे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

कासारवाडी शाळेजवळील पुतळयास त्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसदस्या आशा शेंडगे, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्य शाम लांडे, माऊली थोरात, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

एच.ए.कॉलनी, पिंपरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयासही त्याच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्या सुलक्षणा शिलवंत – धर, अनुराधा गोरखे, नगरसदस्य माऊली थोरात, माजी नगरसदस्य मोहम्मदभाई पानसरे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, जनतासंपर्क अधिकारी रमेश भोसले आदी उपस्थित होते.

लांडेवाडी, भोसरी येथील पुतळयासही महापौर ऊषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पांहार अर्पण करण्यात आला. यावेळी पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, नगरसदस्या सुलक्षणा शिलवंत – धर, अनुराधा गोरखे,  जनतासंपर्क अधिकारी रमेश भोसले आदी उपस्थित होते.

भोसरी पी.एम.टी. चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णांकृती पुतळयास महापौर ऊषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, नगरसदस्या अनुराधा गोरखे, प्रियंका बारसे, क्षेत्रीय अधिकारी श्रीनिवास दांगट, जनतासंपर्क अधिकारी रमेश भोसले आदी उपस्थित होते.

Exit mobile version