Site icon साप्ताहिक एकच ध्येय

स्वच्छ भारत अभियान-ग्रामीणच्या दुस-या टप्प्याला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वच्छ भारत अभियान-ग्रामीणच्या दुस-या टप्प्यातल्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.२०२४-२५ पर्यंत चालणा-या या अभियानात हागणदारी मुक्त परिसराला प्राधान्य देण्यात येईल.

शिवाय सुका आणि ओला कचरा व्यवस्थापनावरही भर दिला जाईल. प्रत्येकाला शौचालयाचा वापर करता यावा, यासाठी संबंधित योजनेवर २०२४-२५ पर्यंत ५२ कोटी ६८७ लाख रुपयाची तरतूदही करण्यात आली, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैठकीनंतर बातमीदारांना दिली.

Exit mobile version