Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आशियायी कुस्ती स्पर्धेत ग्रेको रोमन प्रकारात आशु, आदित्य कुंडू आणि हरदीपनं पटकावली कांस्य पदकं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या आशियायी कुस्ती स्पर्धेत ग्रेको रोमन प्रकारात आशु, आदित्य कुंडू आणि हरदीपनं आपापल्या वजनी गटात काल कांस्य पदकं जिंकली. भारतानं आतापर्यंत पाच पदकं जिंकली आहेत.

आशुनं सीरियाचा कुस्तीपटू मीहोमाड अल- हसन याला ८-१ ने हरवलं. आदित्य कुंडूने जपानच्या नाओ कुसाकाला ८-० नं हरवलं. आणि हरदीपनं किर्गिस्तानच्या बेकसुलतान मखमादझनोविच ला ३-१ ने ना,नमवलं.

Exit mobile version