Site icon साप्ताहिक एकच ध्येय

उद्योग, पर्यटन आदी क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल – राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची ग्वाही

विविध देशांच्या महावाणिज्यदुतांशी साधला संवाद
मुंबई : जगभरातील विविध देशांशी संबंध वृद्धींगत करण्यास महाराष्ट्र राज्य उत्सूक आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वच बाबतीतील आघाडीचे राज्य आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून महाराष्ट्र हे उद्योजकांचे आवडते गुंतवणूक केंद्र आहे. जगभरातील विविध देशांनी पर्यटनउद्योग यांसह विविध क्षेत्रात महाराष्ट्रात गुंतवणूक करावी. या साठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेलअशी ग्वाही राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी जगभरातील विविध देशांच्या महावाणिज्यदुतांना दिली.
हॉटेल ट्रायडंट येथे डिप्लोमॅटिक कम्युनिटी यांच्यामार्फत विविध देशांच्या महावाणिज्यदुतांची परिषद आयोजित करण्यात आली होतीत्यावेळी श्री. ठाकरे बोलत होते. इस्त्राईलचे महावाणिज्यदूत याकोव्ह फिनकेल्स्टाईनन्युझीलँडचे महावाणिज्यदूत राल्फ हेज, पीजीके ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन डॉ. गुल क्रीपलानी, राज्याच्या मुख्य राजशिष्टाचार अधिकारी आणि राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्यासह विविध देशांचे महावाणिज्यदूत उपस्थित होते.
 
जगभरातील पर्यटकांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र उत्सूक
मंत्री श्री. ठाकरे म्हणाले कीमहाराष्ट्र हे देशातील एक महत्त्वाचे राज्य आहे. राज्यात रोजगार निर्मितीवर भर देण्यात येत असून त्यासाठी उद्योग निर्मिती आणि गुंतवणुकीला चालना देण्यात येत आहे. राज्यात ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ अंतर्गत उद्योगसुलभ वातावरण आहे. पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्र महत्त्वाचे राज्य असून इथे इको टुरीजम, हेरीटेज टुरीजममेडीकल टुरीजमवन्यजीव पर्यटनअध्यात्मिक पर्यटनसाहसी पर्यटन अशा विविध पर्यटनसंधी उपलब्ध आहेत. या पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आपल्या देशातील पर्यटकांना महाराष्ट्रात निमंत्रित करावेअसे आवाहन त्यांनी यावेळी केले. राज्यात पर्यटन सुविधांच्या विकासासाठी व्यापक कार्य केले जात असून जगभरातील पर्यटकांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र उत्सूक आहेअसे त्यांनी सांगितले.
 
यावेळी मुख्य राजशिष्टाचार अधिकारी आणि राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनीही विचार व्यक्त केले. मुंबईतील विविध देशांच्या महावाणिज्यदूत कार्यालयांसाठी सर्व प्रकारच्या सहकार्यासाठी राजशिष्टाचार विभाग कटीबद्ध आहेअसे त्यांनी सांगितले.
Exit mobile version