नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगाला कट, कॉपी व पेस्ट या संकल्पनेची ओळख करून देणार्या संगणक शास्त्रज्ञाचे गुरुवारी निधन झाले. लॅरी टेस्लर असे त्यांचे नाव होते. सन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांचे निधन झाले.
फाइंड आणि रिप्लेसचाही शोध त्यांनीच लावला होता. त्यांचा जन्म २४ एप्रिल १९४५ ला न्यूयॉर्क येथे झाला होता. लॅरी टेस्लर यांनी स्टॅनफोर्ड येथे संगणक शास्त्राचा अभ्यास केला आणि १९६० पासून सिलिकॉन व्हॅलीमध्ये काम करायला सुरवात केली.
सुरुवातीला काही काळ झेरॉक्सच्या संशोधन केंद्रातही ते कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी अँपलमध्ये कामाला सुरुवात केली. एकूण १७ वर्षे ते अँपलमध्ये कार्यरत होते आणि मुख्य शास्त्रज्ञ म्हणूनही त्यांनी अँपलमध्ये काम केले.
अँपल सोडल्यानंतर त्यांनी काही काळ शिक्षण क्षेत्रात स्टार्टअपमध्ये काम केले तसेच अँमेझॉन आणि याहूमध्येही काम केले.