नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुरख्यासह, चेहरा झाकणाऱ्या सर्व वस्त्रांवर बंदी आणण्याची सूचना श्रीलंकेच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विशेष संसदीय समितीनं आपल्या अहवालात केली आहे. तसंच जातीय आणि धार्मिक आधारावर चालणा-या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करावी, असंही या समितीनं म्हटलं आहे.
ईस्टर संडेला झालेल्या बॉम्ब स्फोटाच्या पार्श्वभूमीवर गठीत केलेल्या या समितीनं १४ संवेदनशील विषयांवर सूचना केल्या आहेत. बहुतेक देशांमध्ये अशा वस्त्रांवर बंदी घातली आहे.
चेहरा झाकलेल्या कोणत्याही व्यक्तीची चौकशी करण्याचे अधिकार पोलिसांना द्यावेत, मदरश्यांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यर्थ्यांना तीन वर्षाच्या आत सामान्य शाळेत दाखल करावं.
संभाव्य दहशतवादी हल्ल्यांचं आव्हान लक्षात घेऊन राष्ट्रीय सुरक्षा धोरणात बदल करावा, असंही या अहवालात सुचवलं आहे.