Site icon साप्ताहिक एकच ध्येय

वुहानला वैद्यकीय साधनसामुग्री पाठवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये वुहानला मदतीसाठी पाठवल्या जाणा-या विमानासोबत वैद्यकीय साधनसामुग्री पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी काल नवी दिल्ली इथं बातमीदारांना ही माहिती दिली.

नव्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी चीन सातत्यानं लढत असताना त्यांना पाठिंबा व्यक्त करण्याचा हा छोटा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले. हे विमान परत येताना, आधीच्या दोन विमानांमधून येऊ न शकलेल्या तिथल्या भारतीयांना घेऊन येईल.

ज्यांना परत यायचं आहे, त्यांना तिथल्या भारतीय दूतावासाशी संपर्क साधायला सांगितलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

जपानमधे डायमन प्रिन्सेस जहाजावरच्या आठ भारतीयांना कोरोना विषाणूची बाधा झाली असून, त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत, असं त्यांनी सांगितलं.

Exit mobile version