Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारत भेटीवर येणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद सज्ज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याचं स्वागत करण्यासाठी अहमदाबाद शहर सज्ज झालं आहे.

दोन दिवसांच्या भारत भेटीसाठी ट्रम्प येत्या सोमवारी भारतात येणार असून, गुजरातपासून ते आपल्या दौऱ्याची सुरुवात करतील. अहमदाबाद इथं इंडिया रोडशोची तयारी सुरु आहे.

पारंपारिक वेशभूषेत सजलेले नर्तक तब्बल २८ मंचांवर लोकनृत्य आणि योगमुद्रा सादर करतील. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना या रोडशोच्या मार्गावर सादरकर्ते अभिवादन करतील.

Exit mobile version