नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आगामी भारत दौरा जगातल्या दोन सर्वात मोठ्या लोकशाही देशांमधल्या मजबूत आणि शाश्वत संबंधाचं प्रतिक असल्याचं व्हाइट हाऊसनं म्हटलं आहे.
दोन्ही देशांमधले संबंध लोकशाही परंपरा, समान धोरणात्मक हित आणि दोन्ही देशांच्या लोकांमधील संबंधांवर आधारित असल्याचं वरिष्ठ प्रशासकिय अधिकाऱ्यानं वॉशिंग्टनमध्ये बातमीदाराना सांगितलं.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि प्रधानमंत्री मोदी यांच्यामध्यल्या निकट संबंधांमधून याचं दर्शन घडत, असं ते म्हणाले. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यादरम्यान अनेक महत्त्वपूर्ण क्षेत्रानवर भर दिला जाईल.जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारताच्या ऊर्जा विषयक गरजा भागवण्यासाठी अमेरिका भारताला मदत करायला तयार असल्याचं ते म्हणाले.