नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोलापूरचे भाजपा खासदार जयसिद्धेश्वर महाराज यांचा जातीचा दाखला, जात पडताळणी समितीनं बनावट म्हणून रद्द केला आहे. त्यामुळे ते अडचणीत आले आहेत. तक्रारदार प्रमोद गायकवाड यांनी निकालाची प्रत प्रसार माध्यमाना दाखवली.खासदार जयसिदेश्वर महास्वामींच्या बेडा जंगम जात प्रमाणपत्रावरील सुनावणी 15 फेब्रुवारीला पूर्ण झाली होती.
जात पडताळणी समितीनं वारंवार सांगूनही महास्वामींच्या वतीनं मूळ कागदपत्रं सादर करण्यात आली नाहीत. डॉ. महास्वामी यांच्या जातीच्या दाखल्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना, मूळ कागदपत्रं जोडली आहेत, त्यामुळे जात पडताळणी समितीसमोर ती सादर करता आली नाहीत, असं महास्वामी यांचं म्हणणं आहे. नवं दक्षता पथक नियुक्त करुन पुराव्याची पूर्ण पडताळणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.