Site icon साप्ताहिक एकच ध्येय

इराणमध्ये निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पक्षानं विजयाचा दावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमधे सार्वत्रिक निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पक्षानं विजयी झाल्याचा दावा केला आहे. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर झालेल्या निवडणुकांमधे यंदा सर्वात कमी मतदान झालं होतं.

शुक्रवारी २०८ मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीचे ९५ टक्के निकाल गृहमंत्रालयानं जाहीर केले. त्यांनी राजकीय पक्षांचा उल्लेख न करता केवळ विजयी उमेदवारांची नावं जाहीर केली.

कंझर्व्हेटिव्हच्या उमेदवारांनी २९० सदस्यांच्या संसदमधे २१९ जागा मिळवल्या आहेत. यामधे सतरा महिलांचा समावेश आहे.

यंदाच्या निवडणुकीत ४२ पूर्णांक सहा दशांश टक्के मतदान झाल्याचा गृहमंत्री अब्दुल रझा रहमानी फाजली यांनी सांगितलं.

Exit mobile version