नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य शासनानं शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची महाराष्ट्राच्या संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी केलेली नेमणूक रद्द केली आहे.
तसंच आमदार रविंद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य समन्वयक म्हणून केलेली नेमणूकही रद्द केली आहे. या दोघांनीही पद स्वीकारण्याबाबत असमर्थता व्यक्त केली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. शासन निर्णयात नेमणूक रद्द करण्याचं कुठलंही कारण दिलं गेलं नाही.