नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या प्रथम महिला नागरिक, मेलानिया ट्रम्प आज दक्षिण दिल्लीतल्या शासकीय शाळेला भेट देऊन तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
या शाळाभेटीत मेलानिया आनंददायी अभ्यासक्रमाअंतर्गत शाळेत राबवल्या जात असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेणार आहेत. मेलानिया आज दुपारी तिथं पोचतील, आणि त्या साधारणतः तासभर तिथल्या विद्यार्थ्यांसोबत असतील अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
या शाळेच्या दिशेनं जाणारे सर्व मार्ग सामान्य वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत, तसंच या मार्गावरच्या झाडांची छाटणी केली आहे.