Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतीय भेटीविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेले वक्तव्य

नवी दिल्ली : माझ्या मित्रांनो आणि अमेरिका अध्यक्ष ट्रम्प तसेच अमेरिकेचे सन्माननीय प्रतिनिधी

आपणास माझा नमस्कार,

मी पुन्हा एकदा राष्ट्रपती ट्रम्प आणि त्यांच्या बरोबर आलेल्या सदस्य गटाचे हार्दिक स्वागत करतो, आपल्या कुटुंबियांसह ते भारत भेटीला आले याचा मला विशेष आनंद होत आहे. गेल्या आठ महिन्यातली माझी आणि राष्ट्रपती ट्रम्प यांच्यातील ही पाचवी भेट आहे.

कालची मोटेरा स्टेडियमवरची राष्ट्रपती ट्रम्प यांची अभूतपूर्व आणि ऐतिहासिक भेट कायम स्मरणात राहील. भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध केवळ दोन राष्ट्रातल्या सरकारी अधिकाऱ्यांची भेट नसून ती लोकांची आणि लोकांकरीता झालेली भेट आहे. हे संबंध 21 व्या शतकाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहेत म्हणून आज राष्ट्रपती ट्रम्प आणि मी आम्ही दोघांनी हे संबंध विस्तृत जागतिक व्यूहरचनात्मक भागीदारी म्हणजेच या Comprehensive Global Strategic Partnership  स्तरावर घेऊन जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यामध्ये राष्ट्रपती ट्रम्प यांचा फार मोलाचा वाटा आहे.

मित्रांनो,

आज आम्ही आमच्या चर्चेवेळी या भागीदारी संदर्भातल्या महत्वाच्या अनेक पैलूवर सकारात्मक विचार केला मग तो संरक्षण आणि सुरक्षितता असो वा ऊर्जा संदर्भातील वैशिष्टपूर्ण भागीदारी असो, तंत्रज्ञानातले सहकार्य असो वा एकमेकांना जोडून घेणं असो, व्यापार उद्योग अथवा लोकांचे आपापसातले संबंध असोत. भारत आणि अमेरिकेमधले वाढणारे संरक्षण आणि सुरक्षिततेच्या संदर्भातले सहकार्य हे आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे भागीदारीचे संबंध आहेत. अत्याधुनिक संरक्षण उपकरणांच्या भागीदारीमुळे भारताच्या संरक्षण क्षमतेमध्ये भरघोस वाढ झाली आहे. आम्ही बनवलेली संरक्षण उपकरणे ही दुसऱ्या देशांना कच्च्या मालाचा पुरवठा करत आहे. भारतातली सर्व संरक्षण दले ही अमेरिकेत संरक्षण दलांकडून प्रशिक्षित होत आहेत. गेल्या काही वर्षात आमच्या दोघांच्याही सेनादलांमधल्या कार्यक्षमतेमध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे.

मित्रांनो,

याच पद्धतीने आम्ही आपल्या अंतर्गत सुरक्षेसह आंतरराष्ट्रीय अपराधांविरुद्ध लढण्यासाठी देखील एकत्र येण्यासाठी आपापसातले सहकार्य वाढवत आहोत. आज आपल्या देशांतर्गत सुरक्षिततेबाबत झालेल्या निर्णयामुळे या सहकार्याला बळकटी मिळेल. दहशतवादाच्या समर्थकांना तोंड देण्यासाठी आपले प्रयत्न वाढवण्याचा निश्चय आम्ही केला आहे. राष्ट्रपती ट्रम्प यांनी मादक द्रव्ये आणि अंमली पदार्थ यांच्याविरुद्ध लढाई लढण्याला प्रथम प्राधान्य द्यायचे ठरवले आहे. दोन्ही देशांत मादक द्रव्यांची तस्करी, अमली पदार्थ तस्करांची दहशत आणि संघटीत गुन्हेगारी यासारख्या गंभीर समस्या सोडवण्यासाठी नवी पद्धत अंगीकारण्यासाठी सहमती झाली आहे.

मित्रांनो,

आमच्या दोघांमधली ऊर्जासंदर्भातली कौशल्यपूर्ण भागीदारी तसेच गुंतवणूकही अधिकाधिक वाढत चालली आहे. तेल आणि गॅस करिता अमेरिका ही भारतासाठी महत्वाचा स्रोत बनली आहे. गेल्या चार वर्षातला आमचा एकूण व्यापार जवळजवळ 20 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. नूतनीकरणीय असो वा आण्विक असा दोन्ही क्षेत्रातल्या सहकार्यामुळे नवी ऊर्जा मिळत आहे. अशा पद्धतीने उद्योग 4.0 आणि 21 व्या शतकातल्या उगवत्या तंत्रज्ञानावर देखील भारत अमेरिका सहकार्य आपला ठसा उमटवत आहे. भारतातल्या व्यावसायिकांच्या बुद्धी कौशल्याने अमेरिकेतल्या तंत्रज्ञानाच्या उद्योगांना मजबूत केले आहे.

मित्रांनो,

भारत आणि अमेरिका आर्थिक क्षेत्रातल्या स्वच्छ आणि मुक्त तसेच समतोल व्यापारासाठी कटीबद्ध आहे. गेल्या तीन वर्षात आमच्यातला द्विपक्षीय व्यापारात दोन आकडी वाढ झाली असून तो जास्त संतुलितही झाला आहे. ऊर्जा, नागरी विमानन, सुरक्षा आणि उच्चशिक्षण याबाबींचा जर विचार केला तर या चारही क्षेत्रांनी व्यापारात एकूण 70 अब्ज डॉलर्सचे योगदान आहे. हे सर्व राष्ट्रपती ट्रम्प यांच्या व्यापार नीती आणि निर्णयामुळेच शक्य झाले आहे. माझा विश्वास आहे की येत्या काळात हा आकडा आणखी वाढेल. द्विपक्षीय व्यापाराचा विचार करता आमच्या उद्योग मंत्र्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे. आता मी आणि राष्ट्रपती ट्रम्प मिळून या चर्चेला कराराचे रुप देऊ. आम्हा दोघांमध्ये एका मोठ्या व्यापारी संबंधांवर चर्चा करण्यासाठी एकमत झाले आहे. यातून दोन्ही देशांच्या हिताचे काही आशादायी करार होतील अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो,

वैश्विक स्तरावर भारत आणि अमेरिकेचे सहकार्य आमच्या समान लोकशाही मूल्य आणि उद्देशावरच आधारित आहे. विशेषत: भारत-प्रशांत भूभाग आणि वैश्विक समानता यावरच्या आंतरराष्ट्रीय अनुमतीसाठी हे सहकार्य विशेष महत्वाचे आहे. दोनही देशात जगात पायाभूत सुविधांचा विकास सामग्री शाश्वत आणि पादर्शक निधी उभा करण्यावर दोन्ही देशाचे एकमत आहे. ही आमच्यातली एकी फक्त आमच्यापुरती नाही तर वैश्विक हिताची आहे.

मित्रांनो,

भारत आणि अमेरिका यांच्यातल्या या मैत्रीपूर्ण संबंधांचे महत्व आपापसातल्या लोकांमधल्या नात्यामुळे आहे. व्यावसायिक असोत वा विद्यार्थी असोत अमेरिकेत निवासी भारतीय लोकांचे महत्वपूर्ण योगदान आहे. भारताच्या या राजदूतांनी आपल्या बुद्धीसामर्थ्य आणि परिश्रमांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत महत्वाचे योगदान दिले आहे. एवढेच नाही तर आपली मूल्ये आणि समृद्ध संस्कृतीने अमेरिकन समाजाला देखील गुणवत्तापूर्ण जीवनाचा आदर्श घालून दिलाय. मी राष्ट्रपती ट्रम्प यांना आवाहन करतो की भारतीयांसाठी सामाजिक सुरक्षा अंशदानासंदर्भातल्या व्यावसायिकांनी समाजाच्या सुरक्षिततेबदृदल दिलेल्या टोटलायझेशन करारावर दोन्ही पक्षांनी विशेष चर्चा करावी.

मित्रांनो,

या सर्व बाजूंनी आपल्या या मैत्रीच्या नात्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी ट्रम्प यांनी ही भेट देऊन एक ऐतिहासिक भूमिका निभावली आहे. मी परत एकदा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भारतात आल्याबद्दल आणि भारत अमेरिका संबंधांना नव्या उंचीवर नेऊन ठेवल्याबद्दल हार्दिक धन्यवाद देतो.

Exit mobile version