Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण सुरु

68 गावांतील 15 हजार 358 कर्जखात्यांची पहिली यादी प्रसिद्ध – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

मुंबई : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी लाभार्थी शेतकऱ्यांचे ऑनलाईन आधार प्रमाणीकरण सुरु असून सध्या प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली आहे. राज्यात 68 गावांतील 15 हजार 358 कर्जखात्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज विधानपरिषद आणि विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

श्री.पाटील म्हणाले, राज्यभरातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र, सामूहिक सुविधा केंद्र व बँकांच्या शाखा या ठिकाणी आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर योजनेंतर्गत लाभाची रक्कम थेट त्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version