नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्युझिलंडचे उपप्रधानमंत्री आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री विन्स्टन पिटर्स हे आज चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत येत आहेत. ते आयआयटी दिल्लीतल्या न्युझिलंड केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून भारतीय विश्व परिषदेत इंडो पॅसिफिक या विषयावर भाषण देणार आहेत.
ते आज संध्याकाळी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांची भेट घेणार आहेत. उद्या ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटणार असून त्यानंतर ते मुंबईला येणार आहेत.
शुक्रवारी ते मुंबई शेअर बाजारातल्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहणारआहेत.