Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारताला म्यानमार- थायलंडशी सुमारे ३ हजार किलोमीटर लांबीच्या पॉवर ग्रीडनं जोडण्याची बिम्स्टेकची योजना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिम्स्टेक अर्थात बंगालच्या उपसागर क्षेत्रात बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यविषयक संघटना भारताला म्यानमार- थायलंडशी सुमारे तीन हजार किलोमीटर लांबीच्या पॉवर ग्रीडनं जोडण्याची योजना तयार करत आहे.

बांगलादेशाच्या प्रधानमंत्र्यांचे उर्जा सल्लागार तौफिक ईलाही चौधरी यांनी काल ढाका इथं बिम्स्टेक उर्जा परिषदेच्या उद्घाटन समारंभात ही घोषणा केली.

या उर्जा जाळ्यामुळे या संघटनेच्या सदस्य देशांना आपली उर्जाविषयक मागणी आणि पुरवठ्याचं नियोजन करायला मदत मिळेल आणि त्यामुळे उर्जाक्षमतेचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करता येईल, असं त्यांनी सांगितलं.

या जाळ्यामुळे वीजेचे दर कमी होतील आणि अखंडित वीजपुरवठा उपलब्ध होणार असल्यानं त्याचा फायदा ग्राहकांना देखील होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Exit mobile version