Site icon साप्ताहिक एकच ध्येय

छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण सुधारीत कार्यक्रम जाहिर

बारामती  :  मा.भारत निवडणूक आयोगाने दि.  01 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण सुधारीत कार्यक्रम निर्धारीत केला आहे. भारत निवडणूक आयोगाने सदर कार्यक्रमास मुदतवाढ दिली असून सुधारित कार्यक्रमानुसार  सोमवार,दि. 11 नोव्हेंबर 2019 ते  शनिवार दि. 29 फेब्रुवारी 2020 या कालावधीमध्ये मतदार पडताळणी कार्यक्रम ( EVP) हा मोहिम रुपाने SVEEP च्या मदतीने आणि मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणिकरण सारख्या इतर पुर्व-पुनरिक्षण कार्यक्रमाद्वारे करणे.

पुनरिक्षण उपक्रमांतर्गत शुक्रवार दि. 13 मार्च 2020 रोजी एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे, शुक्रवार दि. 13 मार्च 2020 ते बुधवार दि. 15 एप्रिल 2020 दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी असून शनिवार दि.28 मार्च 2020 आणि रविवार दि.29 मार्च 2020 तसेच शनिवार दि.11 एप्रिल 2020 आणि रविवार दि.12 एप्रिल 2020 रोजी विशेष मोहिमांचा कालावधी तर  गुरुवार दि.30 एप्रिल 2020 पुर्वी दावे व हरकती निकालात काढणे, बुधवार दि.6 मे 2020 पूर्वी प्रारुप मतदार यादीच्या मापदंडाची तपासणी करणे आणि मतदार यादीच्या अंतिम प्रसिध्दी करिता आयोगाची परवानगी घेणे, सोमवार दि. 11 मे 2020 पुर्वी डेटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी याद्यांची छपाई तसेच शुक्रवार दि.15 मे 2020 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे याप्रमाणे कार्यक्रम जाहिर करणेत आला असल्याचे सहा.मतदार नोदंणी अधिकारी, 201 बारामती विधानसभा मतदारसंघ यांनी कळविले आहे.

Exit mobile version