Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नागपूर सुधार प्रन्यासच्या कामकाजाचा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला आढावा

मुंबई :  नागपूर सुधार प्रन्यासच्या कामकाजाचा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानभवनात आयोजित बैठकीत आढावा घेतला.

या बैठकीस नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार, आमदार विकास ठाकरे, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे, नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापती शीतल उगले, नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नागपूर सुधार प्रन्यासच्या काही योजना नागपूर महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असून त्या योजनांच्या कामांना गती देण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले यांनी यावेळी दिले.

Exit mobile version