Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मागास व दुर्बल घटकांच्या कल्याणाला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प – डॉ.सुरेश खाडे

मुंबई : समाजातील मागास,विधवा, परित्यक्ता, घटस्फोटिता, दिव्यांग व निराधार या सर्व दुर्बल घटकांच्या कल्याणाला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प असून सामाजिक न्याय विभागासाठी500 कोटी रुपयांची जादा तरतूद करुन समाजातील मागास घटकांना न्याय दिला असल्याची प्रतिक्रिया सामाजिक न्यायमंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी दिली.

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत अर्थसहाय्यता रुपये 600वरुन रुपये 1,000 इतकी वाढ. एक अपत्य असलेल्या विधवा महिलेस रुपये1100 आणि दोन अपत्ये असलेल्या विधवा महिलेस रुपये 1200 मिळणार आहेत. दिव्यांग हा समाजातील अविभाज्य घटक आहे. त्याला सन्मानाने जगता यावे यासाठी 80 टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तींना शासन घरकुल बांधून देईल. यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा प्रित्यर्थ राज्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याकरिता 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Exit mobile version