नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या दृष्टीनं म्यानमार सोबतच्या भागीदारीला सर्वोच्च प्राधान्य आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. काल राष्ट्रपतीभवन इथं म्यानमारचे राष्ट्रपती यु वीन मिंट यांचं स्वागत केल्या नंतर ते बोलत होते.
शेजारी प्रथम या भारताच्या धोरणानुसार म्यानमारला विशेष प्राधान्य प्राप्त झालं आहे असंही ते म्हणाले. ऊर्जा, परिवहन, डिजिटल जोडणी, पर्यटन आणि पुरातत्त्व व्यवस्थापन आदी क्षेत्रात दोन्ही देशांमधले संबंध आणखी वृद्धिंगत करण्याची गरज कोविंद यांनी व्यक्त केली.