दिल्लीचे राज्यपाल अनिल बैजल यांच्याकडून दंगलग्रस्त भागाची पाहणी
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी ईशान्य दिल्लीतल्या दंगलग्रस्त भागाला आज भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
नागरिकांची परिसरातल्या नागरिकांची भेट देऊन शांतता पाळण्याचं आवाहन बैजल यांनी केलं. या दंगलीप्रकरणात आत्ता पर्यंत 100 प्राथमिक माहिती अहवाल दाखल झाले आहेत.
गेल्या दोन दिवसात या भागात कुठल्याही अप्रिय घटनेची नोंद झाली नाही, या हिंसाचारात 38 जणांनी आपले प्राण गमावले आहेत.