नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगजनांना विविध साहित्याचं वाटप केलं. यावेळी आयोजित सामाजिक सक्षमीकरण शिबीरात प्रधानमंत्र्यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. अशाप्रकारचं देशातलं हे सर्वाता मोठं शिबीर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
या शिबीरात 27 हजार ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना आधारकाठी, व्हिलचेअर, चष्मे, इत्यादी 56 हजार वस्तू आणि उपकरणांचं वाटप करण्यात आलं. औरंगाबाद जिल्हा परिषद समाज कल्याण विभागानं आज दिव्यांग आणि दिव्यांगांसाठी कार्यरत असलेल्यांचा मेळावा घेतला. महसुल आणि ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्धाटन झालं. आमदार अंबादास दानवे यावेळी उपस्थित होते.