नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उत्तरप्रदेशमधल्या चित्रकूट इथून दहा हजार कृषी उत्पादक संघटना अर्थात FPO सुरु करणार आहेत. या संघटनांच्या माध्यमातून लहान, मध्यम आणि भूमीहीन शेतकर्यांना कृषी विषयक तंत्रज्ञान, दर्जेदार बियाणं, खतं, कीटकनाशकं आणि आवश्यक अर्थसहाय्य दिलं जाणार आहे.
या FPO मुळे कृषी क्षेत्रात आणि शेतक-यांच्या आयुष्यात क्रांतीकारी बदल येणार आहे, असं कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी म्हटलं आहे. 25 लाख किसान क्रेडीट कार्डचं देखील वितरण केलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.