Site icon साप्ताहिक एकच ध्येय

समाजमाध्यमांवर भडकावणारे संदेश पाठवणार्‍यांविरोधात कडक कारवाईचे संकेत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर समाजमाध्यमांवरून सामाजिक तेढ निर्माण करणारा मजकूर मोठ्या प्रमाणावर पसरवला जात आहे. असं करणं हा कायद्यानं गुन्हा आहे.

अशा प्रकारांवर दिल्ली पोलीसांची करडी नजर असून, ते करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिल्ली पोलीसांनी दिला आहे. त्यामुळे अशा प्रकारचा कोणताही मजकूर नागरिकांनी पसरवू नये असा सल्ला पोलीसांनी दिला आहे.

तसंच असा प्रकार आढळून आला तर त्या विरोधात १ ५ ५ २ ६ ० या सायबर मदत क्रमांकावर तसंच www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी.

Exit mobile version