Site icon साप्ताहिक एकच ध्येय

दुधामध्ये होत असलेल्या भेसळीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात मोठ्या प्रमाणात दुधामध्ये होत असलेल्या भेसळीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर  यांनी दिले आहेत. त्यांनी आज सांगली इथं वार्ताहरांना ही माहिती दिली.

दुधातील भेसळ थांबली नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करुन, कारवाई केली जाईल, असंही ते म्हणाले.

अडचणीत असणाऱ्या वस्त्रोद्योग आणि यंत्रमागधारकांना मदत करण्यासाठी येत्या सोमवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
Exit mobile version