नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मलेशियात आठवडाभर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुह्युद्दिन यासिन यांची मलेशियाच्या राजे अब्दुल्ला यांनी प्रधानमंत्री म्हणून नेमणुक केली आहे.
त्यांचा शपथविधी उद्या होईल, असं राजवाड्यातून जारी झालेल्या निवेदनात म्हटलं आहे. दीर्घकाळ प्रधानमंत्री पदावर असलेल्या महाथीर मोहम्मद यांनी आठपड्यापूर्वी पदाचा राजीनामा दिल्यावर सरकार कोसळलं होतं.
नवे प्रधानमंत्री मुह्युद्दिन यांना बहुमत सिद्ध करता येईल, असा विश्वास राजे अब्दुला यांनी व्यक्त केला आहे.