नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुंदेलखंड महामार्गामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतील, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल २९६ किलोमीटर लांबीच्या बुंदेलखंड महामार्गाची पायाभरणी केल्यानंतर व्यक्त केला.
हा महामार्ग,चित्रकूट, बंदा, हमीरपूर आणि जलौन या जिल्ह्यांमधून जाईल. या मार्गामुळे बुंदेलखंड आग्रा-लखनऊ आणि यमुना द्रुतगती महामार्गाद्वारे देशाची राजधानी दिल्लीशी जोडला जाणार आहे.
चित्रकूट, बांदा, महोबा, हमीरपूर, जलौन, ओरैया आणि इटावहा या जिल्ह्यांच्या विकासात या मार्गाची महत्वाची भूमिका असेल. प्रधानमंत्र्यांनी ‘हर घर जल’ या नळपाणी योजनेचेही सुरुवात केली.या योजनेमुळे बुंदेलखंड इथल्या हजारो घरांना या योजनेचा लाभ होणार आहे.