Site icon साप्ताहिक एकच ध्येय

एस.एन.श्रीवास्तव दिल्ली पोलीस आयुक्तपदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय पोलीस सेवा दलातले वरिष्ठ अधिकारी एस एन श्रीवास्तव यांनी दिल्ली पोलीस आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारला. ते १९८५ च्या तुकडीतले पोलीस अधिकारी आहेत.

सध्या त्यांच्याकडे दिल्ली पोलिसांच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे विशेष आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. दिल्लीचे पोलिस आयुक्त अमूल्य पटनाईक हे काल सेवानिवृत्त झाल्यानंतर श्रीनिवास यांच्याकडे आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला.

दिल्लीत शांतता आणि सामाजिक सौहार्द पुनर्स्थापित करणं ही आपली प्राथमिकता राहील असं त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं.

Exit mobile version