Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मुस्लिम आरक्षण हा मुस्लिम समाजाची दिशाभूल करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शहरी नक्षलवादी आणि डाव्यांकडून सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या मुद्द्यांवर देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते शिर्डी इथं आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते.

मुस्लिम आरक्षण हा देखील मुस्लिम समाजाची दिशाभूल करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव असल्याचेही ते यावेळी म्हणाले.  राज्यातलं सरकार हे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे चालवत नसून, राष्ट्रवादी काँग्रेस चालवते. त्यामुळे शरद पवारांना हवे तेच निर्णय राज्य सरकार घेत असल्याचं ते म्हणाले.

Exit mobile version