नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विदर्भाप्रमाणे मराठवाड्यातल्या कुणबी मराठा समाजाचा इतर मागास प्रवर्ग-ओबीसीत समावेश करायला सरकारला भाग पाडू, अशी ग्वाही विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
कुणबी मराठा सेवा संघ आणि कुणबी युवा संघाच्या वतीनं जालना शहरात झालेल्या कुणबी हक्क परिषदेत ते बोलत होते.
यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, राहुल पाटील, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर आदी उपस्थित होते.