नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिक्षणाच्या माध्यमातून मुली आणि महिलांचं सक्षमीकरण करण्याला वेग देण्यासाठी केंद्र सरकारनं एक विशेष मोहीम हाती घेतल्याची माहिती मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत बातमीदाराशी बोलत होते. देशात शाळा आणि महाविद्यालयांमधे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
आठवडाभर चालणा-या या विशेष मोहिमेची सुरुवात आजपासून होत असल्याचं ते म्हणाले. मात्र, हा उपक्रम पुढलं वर्षभर चालेल. 2014 सालापासून मुलींच्या शिक्षणांसंबंधी केंद्र सरकारनं अनेक पावलं उचचली असून, त्यामुळे मुलांच्या तुलनेत शाळेत नोंदणी झालेल्या मुलींच्या संख्येत वाढ झाली आहे, हे बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेचं यश असल्याचं त्यांनी सांगितलं.
योग-ऑलिंपियाडच्या धर्तीवर स्वर संरक्षण ऑलिंपियाड शाळांमधून आयोजित केली जाणार आहे. सरकारी शाळांमधल्या सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यींनींना स्व-संरक्षणासाठी प्रशिक्षण दिलं जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.