नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेचा समारोप काल ओदिशातल्या भूवनेश्वर इथं झाला.
चंदीगढच्या पंजाब विद्यापीठानं १७ सुवर्ण, १९ रौप्य आणि १० कांस्य पदकांसह चॅम्पियन्स चषक पटकावला. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठानं १७ सुवर्ण, ११ रौप्य आणि ९ कांस्य पदकांसह दुसरा क्रमांक मिळवला.
पतियाळाच्या पंजाबी विद्यापीठाला १३ सुवर्ण, ६ रौप्य, आणि १४ कांस्य पदकासह तिसरा क्रमांक मिळाला. या क्रीडा स्पर्धांमध्ये एकूण ११३ विद्यापीठांनी भाग घेतला होता.
काल शेवटच्या दिवशी झालेल्या स्पर्धांमध्ये भारतातली सर्वात जलदगतीनं धावणारी महिली द्युती चंद हिनं कलिंगा औद्योगिक तंत्रज्ञान संस्था प्रतिनिधीत्व करताना २०० मीटर धावण्याची शर्यत २३ पूर्णांक ६६ शतांश सेकंदात पूर्ण करुन सुवर्ण पदक पटकावलं.