Site icon साप्ताहिक एकच ध्येय

दिल्ली हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी आज संसद परिसरात महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर निदर्शनं केली.

या हिसेंच्या घटनांची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीकडून न्यायिक चौकशी व्हावी, अशी मागणी आपचे नेते संजय सिंग यांनी नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.

Exit mobile version