नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ससंदीय समित्यांच्या बैठकांना अधिक चांगली उपस्थिती राहील याची काळजी घेण्याचं आवाहन राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी आज सर्व पक्षसदस्यांना केलं. राष्ट्रपतींच्या भाषणावर आभार प्रस्ताव तसंच 2020-21 च्या केंद्रीय अर्थसंकल्पावर पूर्वार्धात दर्जेदार चर्चा झाली, तसंच 96 टक्के फलनिष्पती झाल्याचं ते म्हणाले.
लोकसभेत 46 पूर्णांक 37 शतांश टक्के, तर राज्यसभेत 52 पूर्णांक 57 शतांश टक्के उपस्थिती आहे. नेहमीप्रमाणे राज्यसभेतली उपस्थिती तुलनेनं जास्त आहे. मात्र 1950 च्या दशकात 100 ते 150 दिवस कामकाजाचे असायचे, सध्या ते 60 ते 70 दिवसचं असतात, असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं.