नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशात ढाका इथं गेला महिनाभर सुरु असलेला एकुशे पुस्तक महोत्सव काल संपला.
बांगलादेशच्या या सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक कालावधीच्या पुस्तकमहोत्सवाच्या कालच्या शेवटच्या दिवशी प्रदर्शन मैदानावर या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आणि पुस्तक खरेदीसाठी वाचकांनी मोठी गर्दी केली. दोन फेब्रुवारी रोजी बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्धाटन झालं.
तर काल झालेल्या समारोप समारंभाला सांस्कृतिक विभागाचे राज्यमंत्री के. एम खालिद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावर्षी चार हजार ९१९ नवी पुस्तकं प्रकाशित झाल्याचं आयोजन समितीनं सांगितलं.
पुस्तक विक्रीची एकूण रक्कम ८२ कोटी टका इतकी होण्याचा अंदाज आहे. या प्रदर्शनात प्रकाशकांना प्रकाशनातल्या उत्कृष्टतेबद्दल तसंच इतर संबंधित कामगिरीसाठी अनेक पुरस्कार देण्यात आले.