Site icon साप्ताहिक एकच ध्येय

यवतमाळमध्ये दहावीचा पेपर फुटला?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात आजपासून सुरु झालेल्या दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी यवतमाळच्या महागाव इथल्या जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर कॉपी करण्याचा प्रकार घडल्याचं वृत्त असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं कळवली आहे.

परीक्षार्थ्यांच्या हातात पेपर पडल्यानंतर अवघ्या १५ मिनिटातच व्हाट्स ॲपद्वारे पेपर बाहेर पडला आणि त्यानंतर कॉपी पुरविणाऱ्यांची लगबग या केंद्रावर सुरु होती असं वृत्त आहे. मात्र केंद्र प्रमुखांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. केंद्रावर कोणत्याही शिक्षकाकडे मोबाईल नसल्यानं, पेपर फुटणं शक्य नसल्याचा दावा केंद्र प्रमुखांनी केला आहे.

केंद्राला शिक्षण विभाग आणि तहसील विभागाच्या पथकानंही भेट दिली, त्यावेळी त्यांनाही कुठलाच गैरप्रकार आढळून आलेला नसल्याचा दावाही त्यांनी केला. शाळेला सुरक्षा भिंत नसल्यानं पोलिस सुरक्षा वाढवून देण्याची मागणीही त्यांनी केली.

Exit mobile version