नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : समाजात शांतता, सलोखा आणि ऐक्य राखण्यासाठी भाजपा खासदारांनी प्रयत्न करावेत, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
ही तत्व देशाच्या विकासाकरता अत्यावश्यक आहेत, असं भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर संसदीय व्यवहारमंत्री प्रल्हाद जोशी यांनी वार्ताहरांना सांगितलं. भाजपा खासदारांनी राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावं, असं मोदी यांनी आवाहन केल्याचं जोशी यांनी सांगितलं.