Site icon साप्ताहिक एकच ध्येय

दहावीचा पेपर फुटला नाही – शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण

मुंबई : इयत्ता 10 दहावीचे परीक्षा केंद्र क्र. 3351, कुऱ्हा, काकोडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव येथे मराठी विषयाची प्रश्नपत्रिका फुटीबाबत वृत्त प्रसिध्द झाले आहे.  याविषयी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असून याबाबत नाशिक विभागीय शिक्षण मंडळाकडून सविस्तर अहवाल मागविण्यात आला. विभागीय सचिवांनी सखोल चौकशी करून अहवाल सादर केला आहे. त्यानुसार वरील परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारची प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटीचे वृत्त चुकीचे असल्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री प्रा. गायकवाड यांनी केले आहे. सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना परीक्षेनिमित्त हार्दिक शुभेच्छा असेही मंत्री श्रीमती गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून आवर्जून नमूद केले आहे.

दरम्यान, अशा पध्दतीच्या पेपरफुटीच्या बातम्या पसरविणाऱ्या माध्यमांनीही परीक्षार्थींच्या मानसिकतेवर परिणाम होईल, अशा बातम्या प्रसिद्ध करू नयेत असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री, प्रा. गायकवाड यांनी केले आहे.

Exit mobile version