Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लावंघर उपसा सिंचन योजनेस तत्वत: मान्यता – जलसंपदामंत्री जयंत पाटील

मुंबई : सातारा तालुक्यातील उरमोडी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत असलेल्या लावंघर उपसा सिंचन योजनेस तत्वत: मान्यता देण्यात आली असून त्याबाबत पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले.

विधानभवन येथे यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. यासंदर्भात संकल्पन व अंदाजपत्रक बाबत पुढील कार्यवाही करावी, असेही निर्देश देण्यात आले.

लावंघर उपसा सिंचन योजनेसंदर्भात झालेल्या चर्चेत भूसंपादन, न्यायालयीन अडीअडचणी, पाण्याची आवश्यकता व बचत याबाबत सविस्तर चर्चा झाली. या प्रस्तावित लावंघर योजनेमध्ये लावंघर, म्हसकरवाडी, शिंदेवाडी, करंजे, करुन व आंबावडे या सहा गावांचा समावेश असून प्रस्तावित क्षेत्र 355 हेक्टर (आयसीए) इतके आहे.

यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक खलिल अन्सारी तसेच सातारा पाटबंधारे प्रकल्प अधीक्षक अभियंता बी.आर. पवार व इतर अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version