नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सेतुभारतम् योजनेअंतर्गत सरकार राष्ट्रीय महामार्गांवरील लेव्हल क्रॉसिंग बंद करून त्याजागी ओव्हरब्रिज आणि भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या ४ मार्च २०१६ रोजी सेतुभारतम् योजना सुरू केली होती. राष्ट्रीय महामार्गांवर सुरक्षित आणि निरंतर प्रवास करणं शक्य व्हावं, यासाठी रेल्वेवरील पूल आणि भुयारी मार्ग बांधले जाणार आहेत.
देशाच्या विकासासाठी चांगल्या पायाभूत सुविधांचं जाळं अत्यंत महत्वाचं असतं असं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. देशात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सर्वसमावेशक आणि एकात्मिक भूमिका घेण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.