नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू कश्मीर प्रशासनाने आज 2जी मोबाईल सेवांवरच्या सर्व वेबसाईट्सवर अँक्सेस खुला केला आहे. त्याचबरोबर १७ मार्चपर्यंत लॅण्ड लाईन इंटरनेट सेवाही बहाल केल्या असून समाज माध्यमाच्या व्यासपीठांवरची बंदी उठवली आहे.
दूरसंचार सेवा नियमांचा सुरक्षा परिस्थिती, कायदा आणि सुव्यवस्था तसंच कायदे अंमलबजावणीच्या संदर्भात आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.